Eknath Shinde in Nashik saam tv
Video

Eknath Shinde Video : उरलीसुरली ठाकरे सेना संपवून टाका; एकनाथ शिंदे कडाडले

Eknath Shinde taunts Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केलाय. शिल्लक ठाकरे सेनाही संपवून टाका असं शिंदे थेट म्हणाले.

Nandkumar Joshi

कोकणात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्के देण्यास सुरुवात केली असताना, एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये उरलीसुरली ठाकरे सेना संपवून टाका, असं आवाहन उपस्थित शिवसैनिक आणि लाडक्या बहि‍णींना केलंय. त्यामुळे येत्या काही दिवसांत ठाकरेंना मोठे धक्के बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिल्लक राहिलेली ठाकरेंची शिवसेना संपवून टाका असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. नाशिकमध्ये लाडक्या बहि‍णींसह शिवसैनिकांना हे आवाहन केलं आहे. विरोधकांनी आपल्याला हलक्यात घेऊ नये असा इशाराही त्यांनी दिला.

एक बार मैने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नही सुनता...असं माझं काम आहे. साधा कार्यकर्ता आहे. मला हलक्यात घेऊ नका. बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. ज्यांनी मला हलक्यात घेतलं त्यांचं काय झालं तुम्हाला माहीत आहे, असंही ते म्हणाले.

अडीच वर्षे पायाला भिंगरी लावून एकही दिवस सुट्टी न घेता दिवस-रात्र एक करून रक्ताचे पाणी करून या ठिकाणी 18-18, 20-20 तास, कधी-कधी न झोपता देखील या तुमच्या एकनाथ शिंदेने काम केलं. अडीच वर्षे जे बंद करून ठेवलं होतं ते सगळं सुरू केलं. फक्त फेसबुक लाईव्ह करून काही होत नाही. लोकांमध्ये जावं लागतं. लोकांचे दुःख, त्यांच्या वेदना ऐकून त्यावर फुंकर घालावी लागते, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात ड्रग्जचा मोठा कारखाना सुरू करण्याचा कट उधळला; सव्वा कोटींच्या मुद्देमालासह ८ जणांना अटक

Jalna Tourism : इतिहासातील महत्त्वाचे पान! प्राचीन लेण्यांनी सजलेला जालनामधील 'हा' किल्ला, उन्हाळी सुट्टीत करा भटकंती

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुख मालामाल; दुसऱ्या रविवारी 'राजा शिवाजी' ने बनवला 'हा' मोठा रेकॉर्ड, एकूण कमाई किती?

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT