Eknath Shinde SaamTv
Video

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Eknath Shinde On Assembly Election Results : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला आहे. आमच्या कामाची पोचपावती आम्हाला राज्यातल्या जनतेने दिली, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Saam Tv

हा विजय न भूतो न भविष्यति आहे. राज्यातील जनतेने आम्हाला आम्ही अडीच वर्ष केलेल्या कामाची पोचपावती दिली आहे, अशी प्रतिक्रिया महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी दिली आहे. आज विधानसभा निवडणुकीचे निकाल राज्यात जाहीर होत आहेत. यात सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच्या कलात महायुटी आघाडीवर आहेत. आत्तापर्यंत 219 जागांवर महायुतीला आघाडी मिळाली आहे. याअनुषंगाने एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाचे अभिनंदन करतो. महायुतीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. महायुतीला आशीर्वाद दिल्याबद्दल जनतेचे आभार मानतो. मुख्यमंत्रीपदाचे अजून काही ठरलेले नाही, तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चा करत मुख्यमंत्री कोण हे ठरवणार आहे. आम्ही केलेल्या विकासकामांची जनतेला पोचपावती मिळाली. या विजयामुळे पुढील काळात आमची जबाबदारी वाढली आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT