Eknath Shinde News saamtv
Video

Eknath Shinde Resigned His CM Post : 14 वी विधानसभा विसर्जित, शिंदेंनी राज्यपालांकडे दिला राजीनामा

14th Legislative Assembly Dissolution : एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. त्यानंतर राज्यातली 14 वी विधानसभा बरखास्त करण्यात आली. नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली आहे.

Saam Tv

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर जात आपल्या मुख्यमंत्री पदाचा आज राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर जात आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री पदावर राहून काम बघणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिल्यानंतर 14 वी विधानसभा विसर्जित झाली आहे. यापुढे 15 वी विधानसभा स्थापन होऊन नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. राज्यपालांनी शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांची नियुक्ती केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दादा भुसे, दिपक केसरकर यांची उपस्थिती होती.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात ड्रग्जचा मोठा कारखाना सुरू करण्याचा कट उधळला; सव्वा कोटींच्या मुद्देमालासह ८ जणांना अटक

Jalna Tourism : इतिहासातील महत्त्वाचे पान! प्राचीन लेण्यांनी सजलेला जालनामधील 'हा' किल्ला, उन्हाळी सुट्टीत करा भटकंती

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुख मालामाल; दुसऱ्या रविवारी 'राजा शिवाजी' ने बनवला 'हा' मोठा रेकॉर्ड, एकूण कमाई किती?

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT