Eknath Shinde Shivsena saam tv
Video

Eknath Shinde receives threat : कार उडवून देण्याची धमकी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, VIDEO

Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर यावर त्यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.

Nandkumar Joshi

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार स्फोटानं उडवून देण्याची धमकी मुंबई पोलिसांना मिळाली होती. तशा आशयाचा मेल गोरेगाव आणि जे जे मार्ग पोलीस ठाण्याला मिळाला होता. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मेल जिथून पाठवण्यात आला आहे, त्याचा आयपी अॅड्र्रेस शोधला जात आहे. सगळ्या बाजूने याची चौकशी केली जात आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान धमकी आल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मला पोलीस आयुक्तांनी फोन केला. अशा अनेकदा धमक्या येऊन गेल्या आहेत. त्या धमक्यांचा विचार कधी केला नाही. मी माझं काम करतोय. पुढेही सुरुच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.

गृहमंत्रालयाकडून चौकशी सुरू आहे. यामागे कोण आहे, हे लवकरच समोर येईल, अशी प्रतिक्रिया शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

सांगलीत सापडली पेट्रोलची विहीर? राज्यात आता पेट्रोल स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT