Eknath Shinde Meets CM Devendra Fadnavis saam tv
Video

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे थेट CM फडणवीसांच्या भेटीला; सस्पेन्स वाढला, VIDEO

eknath shinde meets cm devendra fadnavis : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. शिंदेंच्या अचानक भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Nandkumar Joshi

भोंदू अशोक खरात प्रकरणावरून दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानानं उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच, शिंदे हे अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेले. काही वेळापूर्वीच शिंदे हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. ही भेट नेमकी कोणत्या मुद्द्यांवर आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. या भेटीत आता काय आणि कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल, याबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच घडामोडी घडत आहेत. भोंदू अशोक खरातचं प्रकरण उघड झाल्यानंतर त्यात अनेक राजकीय आणि व्हीआयपी व्यक्ती अडचणीत आल्याचे बोलले जात आहेत. खरात प्रकरणामुळंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे दीपक केसरकर यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर केसरकर यांनी माध्यमांकडे याबाबत स्पष्टीकरण दिले होते. ३९ आमदार भेटले असताना माझंच नाव का घेतलं जात आहे, असं ते म्हणाले होते. त्यामुळे आता ते ३९ आमदार कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या सर्व घडामोडी राज्यात घडत असतानाच शिंदेंनी फडणवीसांची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

SCROLL FOR NEXT