EKNAATH SHINDE - AMIT SHAH MEETING UDAY SAMANT VS SANJAY RAUT IN MAHARASHTRA POLITICS  saam tv
Video

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे-अमित शहांची भेट, राऊतांच्या पोटात का दुखतंय?; सामंत भडकले | VIDEO

Uday Samant reaction to Sanjay Raut statement : एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी टीका केली होती. या टीकेला शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Nandkumar Joshi

एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत संजय राऊतांनी खळबळजनक दावा केला होता. त्यावर राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी जोरदार पलटवार केला आहे. शिंदे हे अमित शहा यांना भेटले तर तुमच्या पोटात का दुखतंय, असा सवाल सामंत यांनी विचारला आहे. तर राऊत यांचं भाकित खरं ठरतंय, असं ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे.

काय म्हणाले उदय सामंत?

राऊत साहेब हे अंतर्ज्ञानी आहेत हे आज मला कळलं. जे बाकिच्यांना कोणाला कळत नाही ते त्यांना कळतं अशा पद्धतीने त्यांनी आज स्टेटमेंट केलं आहे. एकनाथ शिंदे जर अमित शहा यांना भेटले असतील तर यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही. यांच्या पोटदुखीवरचा उपाय आपला दवाखाना हा एकनाथ शिंदे यांनी सुरू केला आहे. एक महत्वाची गोष्ट आहे की एखादा फेक नरेटिव्ह कसा सेट करायचा हे यांना अचूक कळलं आहे. अमित शहांना जर एकनाथ शिंदे भेटले असतील तर त्यात वावगं काय आहे, असा प्रतिसवालही सामंत यांनी केला.

संजय राऊत यांचे म्हणणे खरे ठरते - जाधव

संजय राऊतांची अनेक वक्तव्ये मी सांगेल, त्यावर टीका-टिप्पणी केली आहे. त्यांनी केलेले वक्तव्य, त्यांनी केलेली टीका, त्यांनी दिलेली माहिती ही कालांतराने खरीच ठरलेली आहे. त्यामुळे आज संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य कालांतराने खरे ठरण्याकरीता थोडी वाट बघूया, असं भास्कर जाधव म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत आगीच सत्र सुरूच, भांडूपमधील ड्रिम्स मॅालला आग

Jaggery Vs Sugar In Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी गूळ साखरेपेक्षा चांगला आहे का? रक्तातील साखर वाढू नये म्हणून गुळाचे सेवन किती करावे?

Political News: उपमुख्यमंत्र्यांचा घटस्फोट, अनेक वर्षांचा सुखी संसार मोडला; पोस्ट होतेय व्हायरल

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! फटाक्याच्या दुकानाला भीषण आग, एकाचा होरपळून मृत्यू

Gokul President Election: 'गोकुळ'चा अध्यक्ष कोण होणार? आज होणार स्पष्ट, शशिकांत पाटील की रणजीतसिंह पाटील कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT