Eknath Shinde SaamTv
Video

Eknath Shinde : मुख्यमंत्रिपद सोडलं, मात्र गृहखात्यात हस्तक्षेप नको? काय आहे शिंदेंची मागणी, पाहा Video

Mahayuti News : एकनाथ शिंदे यांनी भाजपला मुख्यमंत्रिपद सोडलं असलं तरी गृहखात्याबद्दल ते अद्याप ठाम असल्याचं समजत आहे. तसंच या खात्यात भाजपच्या मुख्यमंत्र्याचा कोणताही हस्तक्षेप त्यांना नको असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Saam Tv

भाजपचा मुख्यमंत्री झाला तरी गृहमंत्री खातं मिळावं यासाठी एकनाथ शिंदे अजूनही ठाम आहेत. मात्र यातही भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा कुठला हस्तक्षेप शिंदेंना नको असल्याचं सूत्रांकडून कळालं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे जे खातं असेल त्या खात्याचा अंतिम निर्णय हा शिंदेंचाच असेल अशी त्यांची मागणी असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. नगर विकास खात्यावर देखील शिंदेंना भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं नियंत्रण नकोय. त्यांना ते अमान्य असल्याची माहिती समोर आली आहे. तर अधिकाऱ्यांची बदली आणि त्यांच्या संदर्भातल्या निर्णयाचे शिफारस करण्याचे अधिकार सुद्धा मंत्र्यांना असतात, मात्र अंतिम सही मुख्यमंत्र्यांची असते. हाच हस्तक्षेप शिंदेंना नको असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

भाजपचा मुख्यमंत्री करण्यास शिंदे राजी असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय. मात्र त्यांना त्याबदल्यात गृहखातं हवं आहे. तसंच गृहखात्यात भाजपच्या मुख्यमंत्र्याचा हस्तक्षेप शिंदेंना नको आहे. एकनाथ शिंदे यांना जे खातं दिलं जाईल त्याचा अंतिम निर्णय शिंदेंचाच असेल, असं सूत्रांनी सांगितलं आहे. तर शिंदे यांची ही हस्तक्षेप न करण्याची मागणी मात्र भाजपला अमान्य असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Juices For Glowing Skin: चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी कोणते ज्यूस प्यावे?

Maharashtra Live News Update: पुण्यात भैरोबा नाला येथील दोन घरांना आग,सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Dahi Bhindi Recipe : ऑफिसमधून आल्यावर फक्त १० मिनिटांत बनवा दही भेंडी, रेस्टॉरंटसारखी चव येईल घरच्या जेवणाला

सर्वात मोठी बातमी! 42 आमदारांवर कारवाई होणार? उच्च न्यायालयानं बजावली नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ

Baby Teeth Cleaning Tips: बाळाचे दात घासायला कधी सुरू करावे?

SCROLL FOR NEXT