saam Tv  Eknath Shinde on Raigad guardian minister
Video

Guardian Minister Row : पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं | VIDEO

Maharashtra Politics : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मात्र, आज झालेली बैठक ही पालकमंत्रिपदाबाबत नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Nandkumar Joshi

पालकमंत्रिपदावरून महायुतीतील भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू असून, नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रिपदी झालेली नियुक्ती रद्द करण्यात आली. रायगडमध्ये पालकमंत्रिपदावरून नाराजीनाट्य सुरू आहे. ते अद्याप संपलेले नाही. आता यावर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

रायगड जिल्हा पालकमंत्रिपदाबाबत बैठक नव्हती, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच रायगडचा जिल्हा नियोजनसंबंधी बैठक झाली. पालकमंत्रिपदाबाबतचा वाद देखील लवकर मिटेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

तटकरे विरुद्ध थोरवे

रायगडच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरे यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, शिवसेनेचे महाडचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांनीही या पदावर दावा केला होता. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर हा वाद मिटला नसल्याने रायगडचं पालकमंत्रिपद रद्द करावं लागलं. तसेच रायगडमध्ये तटकरे विरुद्ध थोरवेही वाद सुरू आहे. त्यात वरिष्ठ पातळीवरून आता कशा प्रकारे मध्यस्थी केली जाते, हे पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT