Eknath Shinde yandex
Video

Eknath Shinde : राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

Eknath Shinde on ladki bahin yojana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचं कौतुक करत आता २१०० रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

मुंबई : महायुतीत मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचं श्रेय लाडक्या बहिणींना दिलं. लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिल्याने यश मिळाल्याची कबुली एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी शेकडो लाडक्या बहिणी पोहोचल्या. त्यांनी एकनाथ शिंदे यांचं औक्षण केलं. यावेळी लाडक्या बहिणींना आता २१०० रुपये मिळणार असल्याचे जाहीर केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे

लाडक्या बहिणींचं स्वागत. शुभेच्छा. लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला आहे.

राज्यात लाडकी बहिण योजना सुपर हिट झाली आहे.

माझी बहीण लाडकी, विरोधकांच्या मनात भरली धडकी. काही लोक फिट येऊन चक्कर येऊन पडले आहेत. एक दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला आहे.

विरोधकांना विरोधी नेता बनवायला संख्या नाही, तुम्ही साफ धुवून टाकलं आहे. लाडक्या बहिणींनी लाट होती आणि त्यात विरोधक वाहून गेले. हा चमत्कार लाडक्या बहिणींनी केला.

हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्हाला १५०० चे २१०० करणार, याचा सुद्धा आपण निर्णय घेतला आहे.

तुम्ही घेतलेला निर्णय यशस्वी झाला आहे. तुम्ही समोरच्या लोकांना डम्पिंगमध्ये टाकून दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT