Shinde - Shah Meeting SaamTv
Video

Shinde-Shah Meeting : सत्तास्थापनेची खलबतं सुरूच, शिंदे-शहांमध्ये पुन्हा दोन दिवसांनी स्वतंत्र बैठक?

Eknath Shinde Latest News : सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून अमित शहा तसंच भाजपला एक प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यावर भाजप काय निर्णय घेईल हे पाहावं लागणार आहे. त्यांनंतर शिंदे आणि शहा यांच्यात पुन्हा बैठक होणार आहे.

Saam Tv

एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची पुन्हा दोन दिवसांनी दिल्लीत बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कालच या दोघांची एक बैठक पार पडली होती. आता पुन्हा एकदा दिल्लीत दोन दिवसांनी एकनाथ शिंदे हे अमित शहा यांची भेट घेणार असून त्यांची बैठक पार पडणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. 12 कॅबिनेट सोबतच विधान परिषदेचं सभापती पद हे महत्वाचं पद या प्रस्तावातून मागीतलं गेलं आहे. हा प्रस्ताव जर मान्य झाला नाही, तर दोन दिवसांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची दिल्लीत बैठक पार पडणार आहे. शिंदे यांनी दिलेल्या प्रस्तावावर आम्ही विचार करू असं अमित शहा आणि भाजपकडून शिंदे यांना सांगितलं गेलं आहे. त्यानंतर दोन दिवसात याबद्दल काय निर्णय घ्यायचा याची माहिती शिंदे यांना दिली जाणार आहे. मात्र यावर भाजप काय निर्णय घेईल हे पाहावं लागणार आहे. त्यानंतर भाजपच्या भूमिकेवर शिंदे यांचं समाधान झालं नाही, तर शिंदे पुन्हा दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Price Hike: साखरेचे दर 18 दिवसात पुन्हा वाढले; ग्राहकांना मोठा झटका, दरात वाढ का होतेय?

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

SCROLL FOR NEXT