Eknath Khadse and Rupali Chakankar saam tv
Video

चेकाळणे शब्दावरून रान पेटलं, वाद पेटल्यानंतर एकनाथ खडसेंनी सांगितला नेमका अर्थ | VIDEO

Eknath Khadse : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणातील आरोपी आणि एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर यांच्याबद्दल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक दावे केले होते. त्यावर रुपालीताई चेकाळून बोलत आहेत, असे खडसे म्हणाले होते. त्यावरून वाद पेटला होता. विरोधकांनी आंदोलन केलं. त्यानंतर खडसे यांनी या आंदोलनाला प्रत्युत्तर देत चेकाळणे शब्दाचा अर्थच समजावून सांगितला.

Nandkumar Joshi

चेकाळणे या शब्दाचा अर्थ गुगलवर जाऊन तपासा असा हल्लाबोल एकनाथ खडसेंनी भाजपवर केलाय. महाराष्ट्रात राहून मराठीचा अर्थ समजत नसेल तर त्यांच्या बुद्धीची कीव येते असंही खडसे म्हणाले. रूपाली चाकणकर चेकाळून बोलत आहेत असं विधान खडसेंनी काल केलं होतं. यावरून विरोधकांनी त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलं होतं.

खडसे काल काय म्हणाले ?

रुपालीताई चेकाळल्या का? कारण रुपालीताई आणि रोहिणीताईंचे किती मैत्रीपूर्ण संबंध आहेत हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे रुपालीताई इतक्या चेकाळून बोलत आहेत. तर त्यांनी सत्य ते बोलावे त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण यासंदर्भात मी जावयाचं समर्थन करणार नाही, असे खडसे म्हणाले होते.

खडसे आज काय म्हणाले?

रुपालीताईंचा उल्लेख मी १३ वेळा केला. अनुल्लेख केला नाही आणि दोन वेळा सांगितलं की चेकाळल्यासारखं बोलतात. गुगलवर जा आणि मराठीचं भाषांतर बघा. चेकाळणे याचा अर्थ आवेश, बेफाम होणे, भडकणे असा होता. चेकाळणे या शब्दाचा मराठी अर्थ खवळणे, चिडणे आणि संतापणे असा होतो, असं खडसे आज त्यावर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, प्रति तोळा आज इतक्या रूपयांना मिळणार, वाचा मुंबई-पुण्यातील ताजा भाव

Maharashtra News Live Update: मध्यरात्रीच्या पावसानंतर साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा - लवारी मार्गावरील पुलावर पाणी

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Mumbai Crime : मुंबईत खळबळ! रिपाई आठवले गटाच्या १५ पदाधिकाऱ्यावर गुन्हा, 'या' ठिकाणी प्लॉट हडपण्याचा प्रयत्न

महागड्या शॅम्पूची गरज नाही, लांब आणि घनदाट केसांसाठी सकाळी प्या हेल्दी ड्रिंक्स

SCROLL FOR NEXT