Baramati news  saam tv
Video

Rain In Baramati: बारामतीत पाणीच पाणी; पावसाने 40 वर्षाचा विक्रम मोडला|VIDEO

Waterlogging at Railway Bridge: राज्यात या वर्षी वेळे आधीच पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे बारामतीमध्ये एका पूलाखाली मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे.

Omkar Sonawane

बारामती आणि दौंड परिसरात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, याचा फटका स्थानिक वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात बसला आहे. दौंड शहरालगत असणाऱ्या पवार पॅलेस येथील रेल्वेच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे दौंडहून नगरकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. या भागात आज दिवसभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे पुलाखालील रस्त्यावर चक्क जलसाठा निर्माण झाला आहे. परिणामी वाहनांची व स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

काही ठिकाणी वाहनांची हालचाल मंदावली असून, वाहतूक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक प्रशासनाला या परिस्थितीची माहिती देण्यात आली असून, जलनिकालासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

SCROLL FOR NEXT