Typing Exam Scam Saam Tv News
Video

Typing Exam Scam: टायपिंगच्या परीक्षेत आढळले चक्क 15 डमी विद्यार्थी!

नंदुरबार जिल्ह्यातील वसंतराव नाईक विद्यालयात धक्कादायक प्रकार. टायपिंगच्या परीक्षेत आढळले चक्क 15 डमी विद्यार्थी

Rachana Bhondave

Nandurbar Exam Scam: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील वसंतराव नाईक विद्यालयात टायपिंग परिक्षेदरम्यान चक्क 15 विद्यार्थी डमी आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपुर्वी या परिक्षा केंद्रावर होत असलेल्या परिक्षेत डमी विद्यार्थी असल्याची गोपनीय माहीती परिक्षा परिषद पुणे यांचे मार्फत तहसिलदार शहादा यांना मिळाली होती. यानुसार नायाब तहसिलदार शैलेश गवते यांनी संबंधीत परिक्षा केंद्रावर जावून विद्यार्थ्यांची तपासणी केली असता 25 विद्यार्थ्यापैकी 1 विद्यार्थी गैरहजर होता. तर उपस्थित 24 मधील 15 विद्यार्थी हे डमी असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी गटशिक्षण अधिकारी यांनी संबंधीत 15 विद्यार्थ्यांवर डिबारची कारवाई केली असून सदर प्रकरणाचा अहवाल परिक्षा परिषदेकडे पाठवला आहे. दरवर्षी टायपिंगचे परीक्षा होत असते त्यात अनेक विद्यार्थी हे परीक्षा देऊ शकत नसल्यामुळे खाजगी खाजगी टायपिंग चालक हे त्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन डमी विद्यार्थी या टायपिंग च्या परीक्षेत बसवले जातात मात्र यावर कोणतीही कारवाई केली जात नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA News : मुंबईत गाळ्यांच्या भाड्यात तब्बल १२१ कोटींची फसवणूक; म्हाडाने १० जणांविरोधात केली कारवाई

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

SCROLL FOR NEXT