Hingoli Farmer 
Video

कोरड्या दुष्काळाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने दिवाळीच्या दिवशीच मृत्यूला कवटाळले

हिंगोली जिल्ह्यातील सावरखेडा गावात दिवाळीच्या दिवशी ५५ वर्षीय शेतकरी कमळाजी केशवराव लगड यांचा मृत्यू झाला. कापूस आणि सोयाबीन पिकांचे दुष्काळामुळे नुकसान, पीक कर्ज आणि मुलाच्या उपचारांचा खर्च अशा आर्थिक अडचणींचा सामना ते करत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

Namdeo Kumbhar

मराठवाडा पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येच्या घटनेने हादरला आहे हिंगोलीच्या सावरखेडा गावात दिवाळी सणाच्या भल्या पहाटे कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले आहे, कमळाजी केशवराव लगड असे 55 वर्षे या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून, कोरड्या दुष्काळामुळे त्यांच्या शेतातील कापूस सोयाबीन पाण्या अभावी पूर्णतः करपून गेले आहे, धक्कादायक म्हणजे सकाळी तीन वाजता आपल्या नातवाला बोलून हा शेतकरी शेतामध्ये गेला आणि तिथेच शेतातील गुराढोरांची चारापाणी करून आखाड्यावर त्याने गळफास घेतला आहे शेतकरी कमळाची लगड यांच्यावर सहकारी सोसायटीसह बँकेचे पीक कर्ज होत मात्र सरकारच्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्याचं नाव समाविष्ट झाले नसल्याने ते नैराश्यात असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे तर शेतकऱ्याच्या मुलाचा देखील काही दिवसापूर्वी अपघात घडला होता त्याच्या उपचाराच्या खर्चाचा भार देखील सोसवत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून ते आर्थिक संकटामुळे विवंचनेत सापडले होते , या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी घरी समजताच कुटुंबाने टाहो फोडला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Dashboard Cleaning: सर्व्हिस सेंटरला जाण्याची गरजच नाही, या सोप्या टिप्सने साफ करा गाडीचा डॅशबोर्ड

Coriander Water Benefits: वजन कमी करण्यासह लिव्हर निरोगी ठेवायचंय? शरीराच्या आरोग्यासाठी प्या हे हेल्दी पाणी

Maharashtra News Live Update: पालकमंत्री शंभूराज देसाईंची दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत बांधावर दिवाळी; ५ हजारांची मदत केवळ अग्रीम असल्याचा खुलासा

एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, नेमकं कारण काय?

Dizziness : चालता चालता अचानक चक्कर आली? घाबरू नका, जीव वाचवण्यासाठी तातडीने करा 'ही' ३ काम

SCROLL FOR NEXT