Dombivali Saam TV
Video

Dombivali : डोंबिवली अंधारात, आठवडाभर सुरुय अघोषित भारनियमन, नागरिक त्रस्त | VIDEO

Padgha Transmission Line Issue : डोंबिवलीतील सुमारे ४ लाख महावितरण ग्राहक आठवड्यापासून अघोषित भारनियमनाचा सामना करत आहेत. नागरिकांना वारंवार वीज खंडिततेचा सामना करावा लागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डोंबिवली परिसरात गेल्या आठवड्यापासून सतत अघोषित वीज खंडित होत असून सुमारे ४ लाख ग्राहकांना याचा फटका बसत आहे. महापारेषणच्या पडघा येथील २२० केव्ही वीज वाहिनीत अडथळे निर्माण झाल्याने वीज यंत्रणा पूर्ववत करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता भारनियमन सुरू केले आहे.

वीजपुरवठ्यातील विस्कळीतपणामुळे नागरिक त्रस्त झाले असून, अनेक सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. महापालिकेनेही याबाबत तक्रार नोंदवली आहे. महापारेषणने सहा नवीन टॉवर उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून, काम शनिवारी पूर्ण झाल्यास रविवारीपासून वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

येथील एमआयडीसी आनंद नगर आणि बाजीप्रभू चौक या विभागाला या अघोषित भार भारनियमनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.दरम्यान, महावितरण आणि महापारेषणने यासंदर्भात कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT