Vidrbha Congress News SaamTv
Video

Vidarbha News : 'विदर्भाच्या नेत्यांचा वाद, दिल्लीत घालणार बैठकीचा घाट'

Congress News Update : विदर्भातल्या काँग्रेस नेत्यांचा वाद आता दिल्लीत पोहोचला आहे. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं आहे.

Saam TV News

विदर्भातल्या काँग्रेस नेत्यांचा वाद आता दिल्लीत पोहोचला आहे. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच या वादावर तोडगा काढण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न आहे.

विदर्भातले नेते खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील वादावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते बैठक घेणार असल्याचं समजत आहे. काँग्रेसचे संघटक सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबत ही बैठक होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार हा मिटणार का ? यावर काही तोडगा निघणार का? यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, ''निवडणुकीच्या तोंडावर अशा बैठका होत असतात'' असं म्हंटल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT