Nashik BJP News SaamTv
Video

Nashik West Constituency : नाशिक पश्चिममधून भाजपात बंडखोरी; दिनकर पाटील मनसेच्या वाटेवर

Rebellion In BJP : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये पहिली बंडखोरी झाली आहे. भाजपचे दिनकर पाटील हे आज मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत.

Saam Tv

नाशिक पश्चिम मतदारसंघातून मोठा ट्विस्ट समोर आला असून या ठिकाणावरून भाजपमध्ये पहिली बंडखोरी झाली आहे. भाजपचे दिनकर पाटील हे आता मनसेच्या वाटेवर आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता ते राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. लोकसभेनंतर विधानसभेला देखील डावलण्यात आल्यानं नाराज दिनकर पाटील यांनी आता बंडखोरी करत भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

दिनकर पाटील हे लोकसभा निवडणुकीत देखील निवडणूक लढवण्यात इच्छुक होते. त्यावेळी देखील त्यांना डावलण्यात आलं होतं. त्यांनंतर ते विधानसभेत देखील नाशिक पश्चिममधून इच्छुक होते. मात्र यावेळी देखील त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता दिनकर पाटील यांनी बंडखोरी करत मनसेची वाट धरली आहे. दिनकर पाटील यांचं नाशिक पश्चिममध्ये मोठं प्रस्थ आहे. अशातच ते आज संध्याकाळी ते 6 वाजता राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश करणार आहेत. याचा मनसेला फायदा होईल का हे पाहाणं महत्वाचं ठरेल.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shengdana Chikki: श्रावणात खास बनवा शेंगदाणा चिक्की, महिनाभर खाता येईल

Raigad To Arnala Fort: रायगड किल्ल्यावरून अर्नाळा किल्ल्यापर्यंत प्रवास कसा कराल? जाणून घ्या प्रमुख टप्पे आणि टिप्स

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

SCROLL FOR NEXT