नांदेडमध्ये कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे.  saam tv
Video

काय वेळ आलीय! पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त, कॅनमध्ये डिझेल देण्यास आजपासून बंदी, VIDEO

Diesel can ban imposed at petrol pumps in nanded : नांदेडमध्ये पेट्रोल पंपांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कॅनमधून डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Nandkumar Joshi

संजय सूर्यवंशी, नांदेड | साम टीव्ही

नांदेड जिल्ह्यात डिझेलची मागणी अचानक 30 ते 35 टक्क्यांनी वाढल्याने टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी पाहायला मिळत असून काही ठिकाणी तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंपांवर पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, डिझेल विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

तसेच आजपासून सर्व पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये डिझेल देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सोशल मीडियावर डिझेल टंचाईबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

नांदेड जिल्ह्यात सध्या इंधन टंचाई नाही. मागणीनुसार जिल्ह्यात इंधनपुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Heart Day: ब्लॉकेज कमी होतील आणि हार्ट अटॅक येणारच नाही! ही 1 भाजी करतील तुमच्या नसा साफ

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 2026 मध्ये ‘या’ राज्यांनी वाढवला DA, तुमच्या राज्याचा नंबर आहे का?

Baramati Crime: बारामती हादरली! मध्यरात्री २ महिलांसोबत भयंकर घडलं, घरातील दृश्य पाहून सर्वजण घाबरले

Ration Card : रेशनकार्ड धारकांवर मोठी कारवाई, महिनाभरात १३ ,२४१ लाभार्थ्यांचा लाभ बंद; कारण आलं समोर

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची होणार पुन्हा पाहणी

SCROLL FOR NEXT