धुळ्यात शिंदेसेनेत अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे.  saam tv
Video

Dhule News : मंत्र्यांसमोरच शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळली, उदय सामंतांनी कान टोचले

Shinde Sena internal conflict in Dhule : धुळ्यात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळून आलीय. पक्षातील मतभेद आणि संघटनात्मक परिस्थितीवरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना गटबाजी थांबवण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. एकजूट न राहिल्यास पक्षाचं नुकसान होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Nandkumar Joshi

भूषण अहिरे, धुळे | साम टीव्ही

Dhule Shinde Sena internal factionalism : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्यासमोरच पक्षातील अंतर्गत गटबाजी उफाळून आली. त्यावर स्वतः सामंत यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. धुळ्यातील पक्षांतर्गत गटबाजी रोखण्यासाठी नवीन प्रयोग करणार असल्याचं ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. त्या बॅनरवर जिल्हाध्यक्षांचा फोटोच नव्हता. यामुळं पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. त्याची गंभीर दखल मंत्री उदय सामंत यांनी घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून धुळ्यात नवीन प्रयोग राबवणार असल्याचे ते म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त धुळ्यामध्येच शिवसेनेत गटबाजी असल्याची खंत सामंत यांनी व्यक्त केली.

सामंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत संबंधितांना चांगलीच तंबी दिली. अंतर्गत गटबाजी करणाऱ्यांना शेवटची संधी असेल. त्यानंतर जर अंतर्गत गटबाजी दिसून आली तर, त्यांना पदावरून हटवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिल द्या, नाहीतर आत्मदहन; म्हाडा कंत्राटदारांचा संताप, अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: भारतामध्ये स्टार्टअपची क्रांती होत आहे - पीएम मोदी

Saturday Horoscope : पैसा मिळेल, भांडणं मिटतील अन् आनंदाची बातमी मिळेल; 'या' ५ राशींना शनिवार शुभ

Mumbai Tourism : मुंबईतच आहे काशीची झलक? मुंबईच्या या भागाला म्हणतात ‘मिनी काशी’

Ulhasnagar Politics : भाजप-शिंदेसेनेत पुन्हा संघर्ष; उल्हासनगरच्या राजकारणाला कलाटणी?

SCROLL FOR NEXT