Dhule News SaamTv
Video

Dhule News : धुळ्यात बसवर दगडफेक, प्रवासी किरकोळ जखमी; परभणीच्या घटनेचे राज्यभरात पडसाद

Maharashtra Bandh News Update : परभणीच्या घटनेचे राज्यभरात पडसाद दिसून येत आहे. धुळ्यात देखील 10 ते 12 जणांकडून बसवर दगडफेक करण्यात आली आहे.

Saam Tv

धुळ्यात एसटी बसवर 10 ते 12 जणांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना आज घडली आहे. नाशिक - शहादा बसवर ही दगडफेक करण्यात आली आहे. यात बसमधील काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. परभणीच्या घटनेचा हा पडसाद असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

राज्यभरात परभणीच्या घटनेत पडसाद आता उमटताना दिसत आहेत. परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या प्रकरणावरून राज्यभरात आंदोलन केली जात आहेत. धुळ्यात आज एसटी बसवर 10 ते 12 जणांनी दगडफेक केली असल्याची माहिती समोर आली आहे. ही दगडफेक नाशिक - शहादा या बसवर झाली असून यात बसमधील प्रवासी जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच धुळे पोलिसांनी घटनास्थळी दखल होत पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे - राज ठाकरे

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT