Dharashiv Flood Saam Tv
Video

Dharashiv Flood: धाराशिवमध्ये पूल वाहून गेल्याने नागरिकांचा JCB मधून प्रवास, पाहा VIDEO

Dharashiv Rain: धाराशिवला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. पूरामुळे विश्वरुपा नदीवरील पूल वाहून गेला. त्यामुळे नागरिकांना जेसीबीच्या माध्यमातून प्रवास करावा लागत आहे.

Priya More

धाराशिवला मुसळाधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. परंडा तालुक्यातील विश्वरुपा नदीला आलेल्या पुरामध्ये पूल वाहून गेला. बार्शीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पर्यायी पूल वाहून गेल्याने बार्शी गावाचा संपर्क तुटला आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जेसीबी मशीनवर बसून दूध उत्पादकांना डेअरीपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन रस्त्याची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातील भांडगाव येथे विश्वरूपा नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. पूल वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे गावकऱ्यांसोबत दूध उत्पादक शेतकऱ्यांना नदी पलिकडे जाण्यासाठी आता जेसीबीचा वापर करावा लागत आहे. पूर आल्यामुळे या नदीचा पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. असे असताना देखील दूध उत्पादक शेतकरी जीव धोक्यात घालून डेअरीपर्यंत दूध पोहचवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT