Dharashiv Rada Saam Tv
Video

Dharashiv: स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटात तुफान राडा, दगडफेकीत ५ पोलिस जखमी; पाहा VIDEO

Dharashiv Rada Video: धाराशिवमध्ये दोन गटामध्ये तुफान राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये ५ पोलिस जखमी झाले आहेत. सध्या गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Priya More

धाराशिवच्या मोहा गावात दोन गटात तुफान राडा झाला. यावेळी जमावाने पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक केली. स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून मोहा गावात हा राडा झाला आहे. दगडफेकीत चार ते पाच पोलिस जखमी झाले आहेत. तसंच ८ ते १० गावकरी जखमी झाले आहेत. आदिवासी समाजाला स्मशानभूमीसाठी जागा दिलेली असताना वेगळीकडे अंत्यसंस्कार केल्याने वाद झाला. स्मशानभूमीच्या वादातून दोन दिवसांपासून गावात वाद दुमसत होता. सकाळी गावकरी आणि आदिवासी समाजाची वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक होती. या बैठकीदरम्यान जमावाने दगडफेक केली. या दगडफेकीनंतर गावात तणावपूर्ण वातावरण आहे. सध्या मोहा गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. गावामध्ये १५० पेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसंच गावामध्ये दंगल नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत आगीच सत्र सुरूच, भांडूपमधील ड्रिम्स मॅालला आग

Political News: उपमुख्यमंत्र्यांचा घटस्फोट, अनेक वर्षांचा सुखी संसार मोडला; पोस्ट होतेय व्हायरल

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! फटाक्याच्या दुकानाला भीषण आग, एकाचा होरपळून मृत्यू

Gokul President Election: 'गोकुळ'चा अध्यक्ष कोण होणार? आज होणार स्पष्ट, शशिकांत पाटील की रणजीतसिंह पाटील कोण मारणार बाजी?

Rain Alert: ऐन दिवाळीत पावसाचा धुमाकूळ सुरूच, ९ राज्यांना झोडपून काढणार; महाराष्ट्रात कसं राहिल हवामान?

SCROLL FOR NEXT