Dhananjay Munde News SaamTv
Video

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंसाठी मुलगा सीशिव उतरला मैदानात, पोस्ट झाली व्हायरल | Video

Seeshiv Munde Post : मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी त्यांचा मुलगा सीशिव आता मैदानात उतरला आहे. सीशिवने सोशल मिडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

Saam Tv

मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी त्यांचा मुलगा सीशिव आता मैदानात उतरला आहे. माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते वाईट देखील नाही आहेत, असं सीशिवने म्हटलं आहे. सीशिवची ही पोस्ट सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. सीशिव हा करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा मुलगा आहे. तर आई छळाचा दावा करत आहे, मात्र तिने आमचा छळ केला असल्याचा दावा देखील सीशिवने या पोस्टमधून केला आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांना काल वांद्रेच्या कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांना देखभालीसाठी २ लाख रुपये देण्याचे आदेश दिलेले आहेत. करुणा शर्मा यांनी मुंडे यांच्या विरोधात छळाची तक्रार दाखल केलेली होती. त्यावर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यानंतर एकीकडे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असतानाच दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे यांचा मुलगा त्यांच्यासाठी मैदानात उतरलेला बघायला मिळत आहे. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा मुलगा सीशिव याने सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने म्हटलं आहे की, वडील सर्वोत्तम नसले तरी आमच्या आईएवढे ते वाईट नाही. वडील आईसोबत कठोर असले तरी आमच्यासोबत ते कठोर नाही. आई छळाचा दावा करते, तसाच छळ तिने देखील आमचा केला आहे. मी, माझी बहीण आणि वडील धनंजय मुंडे यांचा आई करुणा हीने छळ केला, असाही दावा सीशिवने या पोस्टमधून केला आहे. आमच्या कौटुंबिक समस्येला मनोरंजनाचं साधन बनवलं जातं आहे. २०२० पासून वडील आमची काळजी घेत आहेत.

दरम्यान, सीशिवच्या सोशल मिडियावर ही केवळ एकच पोस्ट असल्याने याबद्दल नेटकऱ्यांकडून शंका उपस्थित केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कांदा २५ वरून ६५ रुपयांपर्यंत, साखर ४४ रुपयांवरून ७१ पर्यंत, महागाईनं कंबरडं मोडलं; सरकार दिलासा देणार का?

Cabinet Meeting: राज्याला मिळणार आणखी एक न्यायालय, फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय; कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार?

Ladki Bahin Yojana : सण-उत्सव गोड होणार! लाडक्या बहिणींसाठी ३००० कोटी; फडणवीस सरकारचा शासन निर्णय

Maharashtra News Live Update: भोसरी एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

Tamarind Benefits For Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी चिंचेचा फेसपॅक ठरेल फायदेशीर; असा बनवा घरच्या घरी

SCROLL FOR NEXT