Dhananjay Munde addressing the massive Banjara community march in Jalna, extending support for ST reservation demand. Saam Tv
Video

Dhananjay Munde: मी बंजारा समाजासोबत, हा माझा व्यक्तीगत लढा – धनंजय मुंडे|VIDEO

Hyderabad Gazette Model For Banjara Community Quota: धनंजय मुंडे यांनी जालना येथील बंजारा समाजाच्या विराट मोर्चात सहभाग घेत समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला.

Omkar Sonawane

जालना येथे बंजारा समाजाच्या विराट मोर्चामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थित राहून समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दिला. मुंडे म्हणाले की, बंजारा समाजाला सुद्धा एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी सरकारने गंभीर प्रयत्न करून समिती बसवावी. हैदराबाद गॅझेटमध्ये जशा जाती नमूद आहेत, त्याच पद्धतीने बंजारा समाजालाही आरक्षण मिळावे. ते पुढे म्हणाले, आम्ही सुद्धा एसटी प्रवर्गात आहोत. हा माझा व्यक्तिगत लढा आहे. मंत्री पदावर असतो तर कदाचित या मोर्चाला येणे शक्य झाले नसते. पण समाजाच्या हक्काच्या लढ्यासाठी मी कायमसोबत आहे.

मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये आपण बंजारा समाजासोबत असल्याची ग्वाही दिली. ते पुढे म्हणाले की, जोपर्यंत बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. सरकारला वारंवार विनंती करू, आग्रह धरू. असे धनंजय मुंडे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarvapitri Amavasya 2025: पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वपित्री अमावस्येला करा 'हे' उपाय

पाकिस्तानचाही नेपाळ होणार? भ्रष्टाचार, महागाई अन् अराजकता...जनतेच्या उद्रेकाचा सरकारनं घेतलाय धसका

Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या वडिलांचा नवा कारनामा, अपहरण नाट्यावरचा पडदा अखेर उघडला

Blouse Designs: जरीच्या साड्यांवर ब्लाउज शिवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? जाणून घ्या

Indian Currency: भारतीय नोटांच्या मागील बाजूस कोणकोणत्या भाषांचा वापर करण्यात आला आहे? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT