devendra Fadnavis on CM Post saam tv
Video

Devendra Fadnavis : लवकरच कळेल! मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य, VIDEO

Devendra Fadnavis Statement on CM Post : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय भाजप आणि मोदी-शहांवर सोडला असला तरी, मुख्यमंत्री कोण असेल याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

Nandkumar Joshi

मुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. दिल्लीत खलबतं सुरू आहेत. भाजप आणि नरेंद्र मोदी-अमित शहा जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, त्याला आमचा पाठिंबा असेल असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. पण अद्यापही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट झालेले नाही. आता या चर्चांवर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चांवर लवकरच उत्तर मिळेल, असं सूचक विधान देवेंद फडणवीस यांनी केलं आहे. पक्षश्रेष्ठींसोबत याबाबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

आधी मुख्यमंत्री ठरेल आणि ते मंत्री कोण हे ठरवतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सगळ्या चर्चांना लवकरच उत्तर मिळेल. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते मिळून लवकरच याबाबतचा निर्णय घेतील. आधी मुख्यमंत्री ठरवला जाईल. त्यानंतर जे मुख्यमंत्री होतील ते मंत्री कोण असेल हे ठरवतील. त्यामुळे मुख्यमंत्री कोण असेल याची वाट बघावी. नंतर मंत्री कोण असतील, कुणाची नावे असतील ते समोर येईल, असेही फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT