Devendra Fadnavis Saam Digital
Video

Devendra Fadnavis : मविआला मतं दिली तर सर्व योजना बंद करतील, देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis On MVA : महाविकास आघाडी सत्तेत आल्यास सर्व कल्याणकारी योजना बंद करणार असून हे सावत्र भाऊ असल्याची टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

Sandeep Gawade

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे शहीद क्रांती दिन सोहळा व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन सोहळ्याचे आयोजन स्थानिक भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी केले. कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांची उपस्थिती होती. चिमूरच्या स्थानिक हुतात्मा स्मारक येथे शहिदांना अभिवादन करून शहरातील बीपीएड मैदानावर हा सोहळा पार पडला. कार्यक्रमात लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून या योजनेचे पैसे प्रत्यक्ष खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आपल्या भाषणातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणी झालेल्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार असून राज्यातील दोन कोटी महिलांना प्रत्येकी दर महिना पंधराशे रुपये देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे सांगितले. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास सर्व कल्याणकारी योजना बंद करणार असून हे सावत्र भाऊ असल्याची टीका फडणवीस यांनी केली. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद पुन्हा आम्हालाच मिळणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT