Devendra Fadanvis News SaamTv
Video

Dahanu News : आदिवासींची नैसर्गिक संपत्ती कुणालाही देणार नाही, हा देवाभाऊचा शब्द; फडणवीसांनी सभा गाजवली

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज डहाणूच्या सभेत जल, जंगल आणि जमीन कुणालाही घेऊ देणार नाही, असं वक्तव्य केलं आहे.

Saam Tv

आम्ही भगवान बिरसा मुंडांना मानणारे आहोत. १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडांची जयंती आहे. संपूर्ण भारतात ही १५० वी जयंती एक वर्षापर्यंत साजरी करण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय. भगवान बिरसा मुंडा यांची प्रेरणा घेऊन डहाणू, पालघरच्या आदिवासींचे जल, जंगल आणि जमीन कुणालाही घेऊ देणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज डहाणू येथील सभेत बोलताना म्हंटलं आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, वाढवणच्या बंदरामुळे डहाणू भागाचे चित्र बदलेल. मासेमारी करणारे कोळी बांधवांवर कोणताही अन्याय होणार नाही. पण आहे त्यापेक्षा चांगली अवस्था आम्ही तुम्हाला आणून देऊ. हा देवाभाऊचा शब्द आहे. तुमच्या पारंपारिक व्यवसायाला नवी उंची कशी मिळेल. याची योजना आम्ही आखली आहे. त्यामुळे पुढील काळात कोळी बांधव समृद्ध झालेले पहायला मिळतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसंच अनेकांनी वाढवण बंदराला विरोध केला होता, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT