Devendra Fadanvis News SaamTv
Video

VIDEO : अजित पवारांनी आर. आर. पाटील यांच्यावर केलेल्या विधानावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadanvis News : सिंचन घोटाळा चौकशी प्रकरणात आर. आर. पाटील यांनी केसाने गळा कापला, या अजित पवार यांच्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Saam Tv

'जेव्हा हे सगळं घडलं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची सत्ता होती', अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी आर. आर. पाटील यांच्यावर सिंचन घोटाळा चौकशी प्रकरणावरून केलेल्या आरोपांवर दिली आहे. सिंचन घोटाळा प्रकरणी माझी चौकशी लावण्याच्या फाईलवर सही करून आर. आर. पाटील यांनी केसाने गळा कापला, असं काल अजित पवार यांनी तासगाव येथील सभेत बोलताना म्हंटलं होत. त्या फाईलवरील आर. आर. पाटील यांची सही देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री झाल्यावर मला दाखवली होती, असंही अजित पवार यांनी म्हंटलं आहे. त्यावर आज देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

'माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. 70 हजार कोटींची भ्रष्टाचाराचा आरोप झाला, फाईल तयार केली. आर. आर. पाटील यांनी अजित पवारांची ओपन चौकशी करण्याच्या फाईलवर सही केली. त्यावेळी आर. आर. पाटील यांनी केसाने गळा कापला असं वाटल्याचं अजित पवार यांनी काल तासगाव येथे बोलताना म्हंटलं आहे. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल प्रतिक्रिया देत, 'जेव्हा हे सगळं घडलं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची सत्ता होती. मात्र स्वर्गीय आबा हयात नाहीत. ते त्याबद्दल उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे त्यावर बोलणं बरोबर नाही', असं म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT