Delhi ISI agents arrested by Police saam tv
Video

Breaking News : दिल्लीत घातपात घडवण्याचा कट उधळला, VIDEO

two spy arrested in delhi : दिल्लीत पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयचा घातपात घडवण्याचा कट सतर्क पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी दोन हेर ताब्यात घेतले आहेत.

Nandkumar Joshi

राजधानी दिल्लीतून अत्यंत महत्त्वाची बातमी... दिल्लीत घातपाताचा कट पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी उधळून लावला आहे. हे षडयंत्र पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयनं रचलं होतं. हा कट रचण्यासाठी दिल्लीत आलेल्या दोन हेरांना पोलिसांनी अटक केलीय. अन्सारुल मियां अन्सारी आणि अखलाक आझम अशी त्यांची नावं आहेत. या कटातही पाकिस्तान दूतावासात तैनात असलेल्या दानिशची भूमिका असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. सध्या पोलिस आणि इतर एजन्सी या दोन्ही हेरांची चौकशी करतंय.

अन्सारी पाकिस्तानात पळून जाण्याच्या प्रयत्नात

पोलीस सूत्रांनुसार, अन्सारी हा पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याच्या मुसक्या आवळल्या. अन्सारी हा राजधानी दिल्लीत आयएसआयच्या सूचनेनुसार आला होता. गोपनीय दस्तावेजांची सीडी तयार करून ती पाकिस्तानला पाठवावी, असं आयएसआयने अन्सारीला सांगितले होते. दुसरा हेर अखलाख हा झारखंडच्या रांचीचा आहे. त्यानं अन्सारूलची मदत केली. दोघेही पाकिस्तानच्या हँडलरच्या कायम संपर्कात होते, अशीही माहिती उघड झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

वहिनीला मिळवण्यासाठी सख्ख्या भावाचा काटा; हत्या केल्यानंतरही चेहऱ्यावर हसू,'त्या' क्रूर कृत्याने पोलीसही चक्रावले

Maharashtra News Live Update: एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा

Pune Crime: क्षुल्लक कारणांवरून वाद; पुण्यात रागाच्या भरात पतीनं पत्नीला संपवलं, दीड महिन्यांच्या चिमुकल्यापासून आईचं छत्र हरपलं

बीडमध्ये पुन्हा अपहरणाचा थरार; दिवसाढवळ्या तरुणाला कारमध्ये बसवून पळवलं, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT