Congress Meeting SaamTv
Video

Congress Meeting : राहुल गांधी राज्यातील कॉंग्रेस नेत्यांशी करणार चर्चा; दिल्लीत महत्वाची बैठक

Assembly Election : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणनिती ठरवण्यासाठी आज कॉंग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक पार पडणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत कॉंग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी राज्यातील कॉंग्रेसचे सर्व नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यात महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण आणि वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे. यावेळी राज्यातील प्रमुख सहा नेत्यांशी राहुल गांधी आगामी विधानसभेच्या अनुषंगाने चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी महाविकास आघाडीतील तिढा असलेल्या जागांवरती सुद्धा चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या जागावाटपाबरोबरच प्रचाराची रणनिती देखील या बैठकीत आखली जाऊ शकते.

दरम्यान, ''महाराष्ट्रात लोकसभेला जश्याप्रकारे आम्ही निर्णय दिला आहे त्यापेक्षा चांगली कामगिरी आम्ही विधानसभेत देखील करू. महाविकास आघाडीच मुख्यमंत्री असेल. जागावाटपाचा तिढा आम्ही सोडवला आहे. काही जागांबद्दल चर्चा होण बाकी आहे, तेही लवकरचं होईल,'' असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT