Arvind Kejriwal Arrest  Saam TV
Video

Arvind Kejriwal Arrest : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना CBI कडून अटक, पाहा VIDEO

Arvind Kejriwal arrested by CBI : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने अटक केली आहे.

Satish Daud

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सीबीआयने अटक केली आहे. सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी सुरू होण्यापूर्वीच सीबीआयने केजरीवाल यांना ताब्यात घेतलं आहे. दिल्लीतील मद्य धोरणात अरविंद केजरीवाल यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप आहे.

ईडीने अटक केल्यानंतर केजरीवाल यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीच्या सत्र न्यायालयाने २० जून रोजी केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. याला ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हायकोर्टाने आव्हान याचिका फेटाळून लावल्यानंतर ईडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

त्यावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने जामिनावर स्थगिती दिली. यानंतर आज सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. त्यामुळे केजरीवाल यांची पुन्हा तुरुंगात रवानगी केली जाणार आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना अटक होताच आम आदमी पक्ष आक्रमक झाला आहे. त्यांनी एनडीए सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT