Manish Sisodia Saamtv
Video

Delhi Assembly Result : आपच्या मनीष सिसोदिया यांचा पराभव; दिली पहिली प्रतिक्रिया| Video

Manish Sisodia Defeated in Jangpura : आज दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. यात आम आदमी पार्टीला धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. आपचे दिग्गज नेते मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे.

Saam Tv

आज दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. भाजप विरुद्ध आप अशी ही चुरशीची लढाई या ठिकाणी होताना बघायला मिळत आहे. यात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला पहिला मोठा धक्का बसलेला बघायला मिळत आहे. आपचे दिग्गज नेते माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला बघायला मिळत आहे. जंगपुरा मतदारसंघामधून सिसोदिया विधानसभेची निवडणूक लढवत होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप) हा मोठा धक्का मानला जात आहे. दिल्लीतील आम आदमी पक्षाने सत्ता गमावली असल्याचं बघायला मिळत आहे. अशातच त्यांच्या नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागत आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आपचे जंगपुरा मतदारसंघाचे उमेदवार मनीष सिसोदिया यांचा भाजप उमेदवार तरविंदर सिंग मारवाह यांनी पराभव केलेला आहे. त्यामुळे आपला धक्का बसला आहे.

दरम्यान, परभवानंतर मनीष सिसोदिया यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. 'पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच झुंज दिली; आम्ही सर्वांनी कठोर परिश्रम केले. लोकांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. पण, माझा ६०० मतांनी पराभव झाला. विजयी उमेदवाराचे मी अभिनंदन करतो. ते मतदारसंघासाठी काम करतील, अशी आशा आहे', असं सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT