Solapur news  saam tv
Video

Truck Accident: भरधाव कंटेनरची अ‍ॅसिड टँकरला धडक, चालकाचा जागीच मृत्यू; अपघाताचा थरारक CCTV VIDEO

Fatal Road Accident on Solapur-Hyderabad Route: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर मुळेगाव तांडा परिसरात भीषण अपघात झाला आहे. भरधाव कंटेनरने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऍसिड टँकरला धडक दिली.

Omkar Sonawane

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर मुळेगाव तांडा परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने दुभाजक तोडत विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऍसिड टँकरला जबर धडक दिली. या भीषण अपघातात टँकरचालकाचा मृत्यू झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

धडकेनंतर टँकरमधून नायट्रिक ऍसिडची गळती सुरु झाली. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने घबराट उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT