Eknath Shinde SaamTv
Video

Eknath Shinde : एकनाथ शिंदे करणार आभार यात्रा, काय आहे नियोजन? पाहा Video

Eknath Shinde Abhar Yatra : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचं बळ वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे राज्यात आभार यात्रा करणार आहे.

Saam Tv

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २३ जानेवारीपासून महाराष्ट्रात आभार दौरा करणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीपासून या आभार दौऱ्याची सुरुवात होते आहे. तसंच २३ जानेवारीला मुंबईच्या बीकेसीमध्ये शिवसेनेचा मेळावा देखील होणार आहे. तर कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन आभार यात्रेची सुरुवात होणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेची ताकद वाढवण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे. कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. बीकेसी २३ तारखेला होणाऱ्या आभार दौऱ्यानंतर ते आपला आभार दौरा सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्याच्या नियोजनासाठी बैठक देखील घेण्यात आली आहे. दौरा कसा असावा याबाबत या बैठकीत चर्चा झाली असून लवकरच दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल असं सामंत यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याणमध्ये भाजप-शिंदेसेना संघर्ष! आनंद दिघे पुलावरुन श्रेयवाद रंगला|VIDEO

लग्न झालं अन् सासरी निघाली, वाटेतच नवरी गायब; नवरा डोक्याला हात लावून बसला, नेमकं काय घडलं?

Pune: फोडलेला नारळ, लिंबू, हदळ-कुंकू अन्...; घरासमोर जादूटोण्याचा प्रकार; घटनेचा सीसीटीव्ही VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: शिंदे यांच्या शिवसेनेकडून नाशिकच्या तपोवनात आंदोलन सुरू

राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात; भाजप मंत्र्याचा रोख कुणाकडे? VIDEO

SCROLL FOR NEXT