Eknath Shinde SaamTv
Video

Eknath Shinde : विरोधक चारीमुंड्या चीत झालेत; लाडकी बहीण योजनेवरून एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा, Video

Ladki Bahin Yojana News : कोणतीही पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेवर उत्तर दिलं आहे. आज प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

Saam Tv

लाडकी बहीण योजना बंड पाडण्यासाठी विरोधक कोर्टात देखील गेले होते. त्यावर कोर्टानेही त्यांना फटकारलं आहे. त्यांचा सुरुवातीपासून या योजनेला विरोध आहे. म्हणून मी माझ्या लाडक्या बहिणींना या सावत्र आणि दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवायला सांगितलं होतं. आता विरोधक चारीमुंड्या चीत झाले आहेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आज मध्यमांशी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केलं. लाडक्या बहिणींना आम्ही सहावा हप्ता देखील दिला आहे. कोणतीही पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, असंही त्यांनी पुढे बोलताना सांगितलं आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, संतोष देशमुख यांची हत्या ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी आणि सीआयडी चौकशीचे निर्णय योग्य आहेत. त्यात अत्यंत बारकाईने चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील एकही दोषी आरोपी सुटणार नाही. कानून के हाथ लंबे होते है. नाक दाबल्यावर तोंड उघडलं आणि फरार झालेले आरोपी शरण आले. उरलेल्या आरोपींना देखील पोलीस लवकरच पकडतील. या प्रकरणात विशेष वकील लाऊन फास्टट्रॅक कोर्टात ही केस चालवली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, गिरणी कामगारांसाठी देखील लवकरच १ लाख पक्की घरं उभारली जाणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आहे. याबाबतच धोरण तयार झालं आहे. एमएमआर परिसरात गिरणी कामगारांची घरं उभारली जातील, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT