DCM Eknath Shinde SaamTv
Video

Eknath Shinde News : 'मंत्रिपदासाठी ..', नाराज आमदारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सल्ला | VIDEO

DCM Eknath Shinde On Cabinet Expansion : मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वे यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Saam Tv

पहिल्या टप्प्यात ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही ते पक्षाचं काम करतील. संघटना वाढवण्यासाठी काम करतील, दुसऱ्या टप्प्यात त्यांना मंत्रिपद मिळेल. मंत्रि‍पदासाठी श्रद्धा, सबुरी ठेवावी लागते. मंत्रिमंडळात संधी नाही मिळाली त्यांना पक्ष संघटनेत स्थान मिळेल, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदारांना दिला आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिवसेनेतील काही आमदार नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून देखील दाखवली आहे. त्याच अनुषंगाने आज विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पदापेक्षा आमचं उत्तरदात्वीय हे लोकांशी जी नाळ जोडली आहे त्याच्याशी आहे. अडीच वर्षात आम्ही प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलं. आता आमची जबाबदारी वाढली आहे. शिवसेना एक कुटुंब आहे, कोणी कुठेही जाणार नाही.

तर मराठी माणसांची अस्मिता जपण्यासाठीच शिवसेनेची निर्मिती झाली आहे, महाराष्ट्रात मराठी माणसाचा कोणालाही अपमान करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया कल्याणच्या घटनेवर शिंदे यांनी दिली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या घटनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणाचाही मुलाहीजा ठेवला जाणार नाही, असंही त्यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT