Ajit Pawar on Sharad Pawar Saam Tv
Video

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

Ajit Pawar News: विधानसभेपूर्वी अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष करत वयाचा मुद्दा उपस्थित करत खंत व्यक्त केलीय. त्यासाठी दादांनी सासू सुनेचं उदाहरण दिलंय. नेमकं दादा काय म्हणाले? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Satish Kengar

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभेनंतर अजित पवार यांनी शरद पवार यांचे तिखट हल्ले सौम्य केलेत. मात्र त्यांच्या तोंडी एक मुद्दा असतो तो म्हणजे शरद पवारांच्या वयाचा. आताही अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत सासू सुनेचं उदाहरण दिलंय. सून म्हातारी होऊस्तोवर तसंच बघत बसणार का? असं टोला अजित पवारांनी काका शरद पवारांना लगावलाय.

लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांकडून शरद पवारांच्या 84 वर्षे वयाचा मुद्दा उपस्थित करत तिखट हल्ले केले होते. एवढंच नाही तर मी तुमच्या पोटी जन्माला आलो नाही ही माझी चूक आहे का? असा उद्विग्न सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता.

विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित दादांकडून आपल्याला नेतृत्वाची संधी मिळत नसल्याने आपण बंड केल्याचं स्पष्ट केलंय. मात्र हा मुद्दा लोकांना मान्य होणार का? यावर अजित पवारांच्या पक्षाच्या विजयाचं समीकरण अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT