IAS success Saam Tv
Video

Yavatmal News: आयएएस झाली ‘मोहिनी’ अन आनंदात वडिलांचा मृत्यू|VIDEO

Emotional Story: एका मुलीची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाल्याचा आनंद साजरा करत असतानाच तिच्या वडिलांना आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Omkar Sonawane

एका मुलीची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाल्याचा आनंद साजरा करत असतानाच तिच्या वडिलांना आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे घडली.

प्रल्हाद खंदारे (वय अंदाजे ६५) असे निधन झालेल्या वडिलांचे नाव असून ते पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त अधिकारी होते. त्यांची मुलगी मोहिनी खंदारे हिची नुकतीच आयएएस पदासाठी निवड झाली होती. या यशामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते.

खंदारे कुटुंबाकडून याचा मोठा जल्लोष करत आनंद साजरा केला जात असतानाच अचानक प्रल्हाद खंदारे यांना तीव्र छातीत दुखू लागले आणि ते कोसळले. तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या दुःखद घटनेमुळे खंदारे कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे. एकीकडे मुलीच्या यशाचा अभिमान असतानाच दुसरीकडे वडिलांच्या अचानक जाण्यामुळे शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पावसाला सुरुवात, पुणेकरांना तात्पुरता दिलासा

Kidney Stone Symptoms : पाठदुखी करू नका दुर्लक्षित, असू शकतो किडनी स्टोनचा धोका; डॉक्टरांनी सांगितली ४ गंभीर लक्षणं

कोरड्या त्वचेसाठी सर्वात भारी उपाय! 'दूध-हळदीचा' फेसपॅक

Tax free income: कोणकोणत्या कमाईवर सरकार टॅक्स लावत नाही?

ऑपरेशन टायगर फेल? उद्या मातोश्रीवर येतो; ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना निरोप?

SCROLL FOR NEXT