Sambhajinagar Bike Stunt Saam Tv
Video

Sambhajinagar Bike Stunt: धावत्या बुलेटवर उभं राहून स्टंट, संभाजीनगरमध्ये तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी, VIDEO व्हायरल

Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये बुलेटवर उभं राहून तरुणाने जीवघेणी स्टंटबाजी केली. मोंढा उड्डाणपुलापासून ते आकाशवाणी चौकापर्यंत या तरुणाने राईड केली. स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

संभाजीनगरमध्ये तरुणाचा जीवघेणी स्टंटबाजी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुलेटवर उभं राहून आणि दोन्ही हात सोडून या तरुणाने स्टंटबाजी केली. मोंढा उड्डाणपुलापासून ते आकाशवाणी चौकापर्यंत या तरुणाने राईड केली. स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी याची दखल घेतली. पोलिस या तरुणाचा शोध घेत आहेत.

इन्स्टाग्रामवर रील बनवण्यासाठी या तरुणांनी ही स्टंटबाजी केली आहे. तरुणांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस आपल्यावर कारवाई करतील या भीतीने त्यांनी आपले इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केले आहे. सचिन लिपने असं स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

संभाजीनगर शहरातील जालना रोड या वर्दळीच्या रस्त्यावर या तरुणाने बुलेटवर उभं राहून आणि आपले हात हवेमध्ये मोकळे सोडून ही जीवघेणी स्टंटबाजी केली. एखाद्या चित्रपटातील स्टंटप्रमाणे या तरुणाने ही स्टंटबाजी केली. या तरुणाने जरी इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केले असले तरी देखील पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT