Officials demolishing the dangerously tilting five-storey building in Jejuri to prevent a major accident. Saam Tv
Video

धोकादायक पाच मजली इमारत पाडली, प्रकरण काय? पाहा व्हिडिओ

Jejuri Dangerous Five-Storey Building: जेजुरी शहरातील खोमणे आळी परिसरात बांधकामाधीन पाच मजली इमारत धोकादायकरीत्या झुकल्याने सकाळी पाडण्यात आली. वेळीच घेतलेल्या उपाययोजनांमुळे मोठा अनर्थ टळला.

Omkar Sonawane

जेजुरी शहरातील खोमणे आळी परिसरात पाच मजली बांधकामाधीन इमारत धोकादायकरीत्या झुकली.

अग्निशमन दल, पोलिस व नगरपरिषद यांची तात्काळ कारवाई झाली.

रहिवाशांचे सुरक्षित स्थलांतर करून परिसर बंद करण्यात आला.

पहाटे कटर्सच्या साहाय्याने सकाळी इमारत पाडण्यात आली, जीवितहानी टळली.

भरवस्तीतील सकाळी ही पाच मजली इमारत आली पाडण्यात आली. सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. जेजुरी शहरातील खोमणे आळीतील बांधकामाधीन इमारत काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धोकादायकरीत्या झुकली होती .जेजुरी नगरपरिषदने अग्निशमन दल व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली. पोलिसांची तातडीची घटनास्थळी घाव घेवून रहिवाशांचे सुरक्षित स्थलांतर केले.

सुरक्षा बॅरिकेट लावून रहदारी थांबविण्यात आली. जेजुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खोमणे आळी परिसरात काल सायंकाळी अंदाजे 5 वाजता बांधकाम सुरू असलेली पाच मजली इमारत अचानक एका बाजूला धोकादायकरीत्या झुकल्याने परिसरात खळबळ उडाली. वेळीच घेतलेल्या उपाययोजनांमुळे संभाव्य अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि जेजुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि नगरपरिषदेचे आधिकरी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

परिसरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन इमारती भोवतालचा परिसर तात्काळ बंद करण्यात आला. तसेच शेजारील रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. पहाटे पुणे महानगर पालिकेचे कटर्स दाखल झाले. सकाळी आठ वाजता इमारत पाडण्याचे काम सुरू झाले आणि क्षणार्धात पाच मजली इमारत खाली कोसळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT