Forensic team examines red paint splashed on Meenatai Thackeray statue in Shivaji Park, Dadar. Saam Tv
Video

मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण; स्मृतीस्थळावर फॉरेन्सिक टीम दाखल|VIDEO

Forensic Team Examines Vandalism At Dadar: दादरमधील शिवाजी पार्कमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्याच्या घटनेची फॉरेन्सिक टीम चौकशी करत आहे. शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला असून सरकारने कडक कारवाईची ग्वाही दिली आहे.

Omkar Sonawane

दादरमधील शिवाजी पार्क मैदानावरील मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ आज सकाळी एका अज्ञात इसमाने लाल रंग फेकल्याने राज्यात तणाव निर्माण झाला आहे. शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत निषेध व्यक्त केला आणि याठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाऊन पाहणी केली.

सर्वच शिवसैनिकांमध्ये त्यांच्यासाठी अतिशय आदर आहे. शिवाजी पार्कला येणार प्रत्येक शिवसैनिक हा मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत असतो.

मात्र आज या पुतळ्यावर सकाळी कुणीतरी लाल रंग टाकल्याचे समजले. हे कळताच शिवसैनिकांनी शिवाजी पार्क मैदानात गर्दी करून जोरदार निषेध व्यक्त केला. या घटनेची सरकारने गंभीर दखल घेत त्या इसमावर कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली. या सगळ्याची कसून चौकशी केली जात असून घटनास्थळी फॉरेन्सिकची टीम दाखल झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT