Maharashtra Aquan Cyclone news AI Image
Video

Aquan Cyclone : 'अक्वान’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही फटका? ४ राज्यांना अलर्ट जारी

Maharashtra Aquan Cyclone Alert : बंगालच्या उपसागरातील ‘अक्वान’ चक्रीवादळ तीव्र होत असून महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि तेलंगणला अलर्ट जारी करण्यात आला आहे. २० नोव्हेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर वादळ धडकण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

बंगालच्या उपसागरात तयार झालेलं ‘अक्वान’ चक्रीवादळ आता अधिक तीव्र होत आहे. या चक्रीवादळाचा परिणाम देशातील चार राज्यांसह महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगण आणि महाराष्ट्रातील काही भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० नोव्हेंबर रोजी दुपारपर्यंत हे चक्रीवादळ नेल्लोर आणि यानमदरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १२० ते १४५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या चक्रीवादळाचा प्रभाव केवळ दक्षिण भारतापुरता मर्यादित राहणार नाही. महाराष्ट्रातील विदर्भ भागातही याचा परिणाम जाणवू शकतो. काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अदरक सोलण्याची सर्वात सोपी ट्रिक, सुरीऐवजी वापरा चमचा

Bike Safety : मस्तच! आता बाईकच्या हेल्मेटलाही एअरबॅग, व्हिडीओ झाला व्हायरल

Maharashtra News Live Update: महापौर दालनाच्या बाहेर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नगरसेवक यांचे आंदोलन

राहुल गांधी भारताचे 'मीर जाफर', विदेशात जाऊन देशाची बदनामी करणं हाच त्यांचा पॅटर्न; 'त्या' वक्तव्यावरून भाजपचा हल्लाबोल

Winter Hand Sweating : हिवाळ्यात हातांना अचानक पाणी सुटतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो त्वचेचा 'हा' गंभीर आजार

SCROLL FOR NEXT