petrol diesel price  Saam Tv
Video

Petrol-Diesel Price: टेन्शन वाढलं! कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तेलाचे दर आता 126 डॉलरवर पोहोचले आहेत. त्यामुळे आता पेट्रोल- डिझेलच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

Priya More

जागतिक बाजारपेठेतून सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूड ऑईल प्रति बॅरल 126 डॉलरच्या पार गेलेत. अवघ्या एका दिवसात तेलाच्या दरात 7 टक्क्यांची वाढ झालीय. मार्च 2022 नंतरचा हा सर्वात मोठा उच्चांकी दर आहे. केवळ एका आठवड्यापूर्वी 100 डॉलरलवर असलेलेल तेलाचे दर आता 126 डॉलरवर पोहोचलेत. इंधन दरवाढीच्या या भडक्यामुळे येत्या काळात भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येण्याची शक्यता आहे.

इराण- अमेरिका युद्धामुळे गेल्या १ महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. या युद्धामुळे कच्च्या तेलाची वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे भारतामध्ये पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला होता. अशातच आता कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पट्रोल-डिझेलच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT