Mumbai Goa Saam TV
Video

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा तडे, पिरलोटे परिसरात पुलावरील रस्त्याला भेगा|VIDEO

Pirlotte Bridge: कळंबणीमधील रस्ता खचल्याच्या घटनेंनंतर आणखी एक समस्या समोर आल्याने या महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पिरलोटे येथील पुलावरच्या रस्त्याला भेगा पडल्याचं समोर आलं आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.याआधी कालच कळंबणी परिसरात महामार्ग खचल्याची घटना घडली होती. आता पुन्हा अशा प्रकारची समस्या समोर आल्याने या महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशा घटना घडत असल्याने, येत्या काळात वाहतूक सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या ठिकाणी अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून या रस्त्याची पाहणी सुरू असून, तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र वारंवार अशा घटना घडणं हे महामार्ग प्रकल्पाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mumbai: खरंच मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार का? मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टच सांगतिलं...

आईची अस्थी घेऊन जाताना कारचा अपघात; भरधाव बसची मागून धडक, २ सख्ख्या भावांसह चौघांचा मृत्यू

Meditation Benefits: दररोज सकाळी १० मिनिटे मेडिटेशन केल्याने शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

KDMC : केडीएमसीचा गलथान कारभार! झोपडपट्टीला २.३३ लाखांची नोटीस; विधवा महिलेचं घर जप्त करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT