corona Saam TV
Video

Corona Update : देशात पुन्हा कोरोनाचा धोका; 4 दिवसांच्या बाळालाही लागण | VIDEO

Rajasthan Corona Update : देशात कोरोनाचा पुन्हा शिरकाव होताना दिसून येत आहे. जयपूरमध्ये सध्या ३६४ सक्रिय कोरोना रुग्ण असून, हे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट बनत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून यंदा लहान मुलांनाही या विषाणूचा संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक आहे. राजस्थानमधील जोधपूर शहरात फक्त चार दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर जयपूरमध्ये एका महिन्याच्या मुलीस कोरोनाची बाधा झाली आहे.

जयपूरमध्ये सध्या सर्वाधिक ३६४ सक्रिय कोरोना रुग्ण नोंदवले गेले असून हे शहर हॉटस्पॉट बनू लागलं आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. लहान मुलांमध्येही कोरोना होऊ शकतो, ही बाब चिंतेची असून नागरिकांनी मास्क वापरणं, गर्दी टाळणं आणि हात स्वच्छ ठेवणं यासारखी काळजी घेणं गरजेचं असल्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?

Kangana Ranaut: कंगना रनौतच्या उलट्या बोंबा सुरूच; राखी सावंतची कंगनाला चोपण्याची भाषा

Thursday Horoscope : वाद-विवादापासून लांब राहा, ८ राशींवर स्वामींची कृपा राहणार; वाचा आजचे राशीभविष्य

Jarange Patil: 'एकतर मी जाईन, नाहीतर सरकार...'; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, 29 ऑगस्टला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

Maharashtra Potholes: खड्ड्यात नेऊन ठेवलाय महाराष्ट्र; महानगरांमध्ये रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

SCROLL FOR NEXT