Uddhav Thackeray and Nana Patole Saam Tv
Video

Thackeray Group Vs Congress: मविआच्या जागावाटपाचा वाद विकोपाला, पटोले असतील तर यापुढे बैठक होणार नाही; ठाकरे गटाची भूमिका: सूत्र

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झालेल्या असतानाच महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. याच दरम्यान एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये टोकाचे मतभेद झालेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या आगामी बैठकांमध्ये नाना पटोले असतील तर यापुढे बैठका होणार नाहीत, अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटानं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय. आता ठाकरे गटाच्या या भूमिकेनंतर नाना पटोले काय बोलणार हे पाहावं लागेल.

दरम्यान, काँग्रेसमुळे मविआतील जागावाटप अडलं, असा अप्रत्यक्ष आरोप संजय राऊतांनी केलाय. काँग्रेसनं जागावाटपाचा निर्णय राज्यात घेतल्यास वेगानं होतील, असं राऊतांनी म्हटलंय. दुसरीकडे त्यांचे नेते राज्यात आहेत, तर आमचे दिल्लीत असल्याचा टोला नाना पटोलेंनी लगावलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT