Chief Election Commissioner Saam Tv
Video

Chief Election Commissioner: एकमत नसतानाही मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, काँग्रेस कोर्टात धाव घेणार

Chief Election Commissioner Gyanesh Kumar: एकमत नसतानाही मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राहुल गांधी यांचा विरोध डावलून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात असल्याचे देखील काँग्रेसने सांगितले.

Priya More

मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती वादात सापडली आहे. ज्ञानेश कुमार यांची नुकताच मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीवरून वाद झाला आहे. काँग्रेसने त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवर काँग्रेस कोर्टामध्ये जाण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांचा विरोध डावलून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कालच्या बैठकीमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या नावावर एकमत झाले नव्हते असे राहुल गांधी यांनी सांगितले. एकमत नसताना सुद्धा केंद्र सरकराने ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती केली. काँग्रेसच्या सुत्रांनी हा आरोप केला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवर आता काँग्रेस कोर्टामध्ये जाऊन आव्हान देणार आहे.

काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या त्रिसदस्यीय समितीमध्ये ही बैठक झाली होती. या बैठकीमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवर राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे एकमत नसताना सुद्धा केंद्र सरकारने ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती केली असल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल

Maharashtra Waterfalls : महाराष्ट्रातील 'हे' ५ धबधबे खूप कमी लोकांना माहितेय, एकदा पाहिल्यावर प्रेमातच पडाल

IMD Alert : रखडलेला मॉन्सून 'या' दिवशी पुन्हा ॲक्टिव्ह; 'या' जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा, तर मुंबई-ठाण्याला उष्णतेचा इशारा

Blood Pressure Control : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी किती वेळ चालणं योग्य? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Health Care: रोज भात खाल्ल्याने वजन वाढते का? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT