Anil Bonde NEws SaamTv
Video

Anil Bonde : बोंडेंच्या विधानाने वाद चिघळला, काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

Amravati News : अनिल बोंडे यांच्या घराबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे बोंडे यांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

Saam Tv

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणसंदर्भातील वक्तव्यावरून सध्या वाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्यावर शिंदे गटाचे संजय गायकवाड तसेच आता भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी वादग्रस्त टीका केली आहे. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलेली दिसत आहे. अनिल बोंडे यांच्या घराबाहेर काँग्रेसने आंदोलन देखील सुरू केले आहे. उद्या राज्यभरात काँग्रेसकडून जोडे मारो आंदोलन देखील करण्यात येणार आहे.

काँग्रेसने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे अनिल बोंडे यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमत अनिल बोंडे यांच्या फोटोला जोडे मारून निषेध केला आहे. त्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत. राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टिकेनंतर आता बोंडे यांच्यावर काँग्रेसच्या मागणीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी काँग्रेसचे कार्यकर्ते राज्यभरात हे जोडे मारो आंदोलन करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फ्री फायरच्या आयडीवरून वाद अन् थेट गळ्यावर चाकू; घटनेने खळबळ

Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

मला प्रचंड त्रास दिला जातोय, आता संयमाचा बांध तुटणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसान पाहणी

रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला; 400 कोटी रुपयांचं नुकसान

SCROLL FOR NEXT