Congress Spokesperson Atul Londhe addressing the media after receiving a serious phone threat. Saam Tv
Video

'तेरे को देख लेंगे’ म्हणत काँग्रेसच्या बड्या नेत्याला दिली फोनवरून धमकी; VIDEO

Serious Phone Threat To Congress Spokesperson Atul Londhe: काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना अज्ञात क्रमांकावरून गंभीर स्वरूपाची धमकी देण्यात आली. ‘तेरेको देख लेंगे’ असे म्हणत फोनवर शिवीगाळ, भाजपवर आरोप, पोलिसांकडे कारवाईची मागणी.

Omkar Sonawane

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना अज्ञात क्रमांकावरून गंभीर धमकी

‘तेरेको देख लेंगे’ म्हणत फोनवर शिवीगाळ आणि धमकीचा प्रकार

टीव्ही डिबेटमध्ये मांडलेल्या भूमिकेमुळे धमकी दिल्याचा संशय

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास करण्याची मागणी

कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना अज्ञात क्रमांकावरून फोन करून गंभीर स्वरूपाची धमकी देण्यात आली आहे. लोंढे यांनी सांगितले की, यापूर्वीही मला अनेक धमक्या आल्या आहेत, पण आजची धमकी अधिक गंभीर होती. एका नंबरवरून सातत्याने फोन करून शिवीगाळ करण्यात आली आणि 'तेरेको देख लेंगे’ असे सांगण्यात आले.

लोंढे यांनी आरोप केला की, बीजेपीच्या लोकांकडे जेव्हा आमच्या प्रश्नांची उत्तरे नसतात, तेव्हा ते अशा पातळीवर उतरतात. आज एका टीव्ही चॅनेलवर विभाजनावर चर्चा होती, त्यावेळी मी सत्य बाजू मांडली. त्यामुळे चिडून अशा प्रकारची धमकी दिली असावी.

ते म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना अशा धमक्या आता ‘कॉमन’ झाल्या आहेत. पोलिसांनी याची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचे लोंढे यांनी स्पष्ट केले. विचार सहन होत नसतील तर चर्चा बंद करा, पण जीवावर उठणे हा प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक आहे. सरकार शांत बसत असेल तर या प्रकारामागे सरकारचाही हात आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो, असे लोंढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले; २२ अन् २४ कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर

VIDEO: दादरमध्ये खळबळ, तरुणाच्या या इमारतीवरुन त्या इमारतीवर उड्या

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

Blood Sugar Level: ब्लड शुगर टेस्ट करताय, तर या कॉमन चुका लगेच टाळा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT