Congress Protest News SaamTv
Video

Mumbai News : पोलिसांकडून काँग्रेस आंदोलकांची धरपकड

Congress Protest : काँग्रेसने राज्यभरात सर्वत्र भाजप विरोधात जोडे मारो आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात मुंबईतील विधानसभा अध्यक्षांच्या घरासमोर पोलिस आणि आंदोलकांत धरपकड झाली.

Saam Tv

राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी काँग्रेसने राज्यभरात सर्वत्र भाजप विरोधात जोडे मारो आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी बोंडे आणि गायकवाड यांच्या निषेधार्थ भाजप विरोधात सुरू असलेल्या या आंदोलनात मुंबईतील कुलाबा भागातील विधानसभा अध्यक्षांच्या घरासमोर पोलिस आणि आंदोलकांत धरपकड झाली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर टीका केली होती. त्यानंतर बुधवारी भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी देखील राहुल गांधी यांची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत बोंडे आणि गायकवाड यांच्या यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन सुरू केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील विधानसभा अध्यक्षांच्या घरासमोर सुरू असलेल्या आंदोलनात पोलिस आणि आंदोलकांत धरपकड झाली. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फ्री फायरच्या आयडीवरून वाद अन् थेट गळ्यावर चाकू; घटनेने खळबळ

Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

मला प्रचंड त्रास दिला जातोय, आता संयमाचा बांध तुटणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसान पाहणी

रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला; 400 कोटी रुपयांचं नुकसान

SCROLL FOR NEXT